हेड मास्टरंचे अब्राहम लिंकन यांस उत्तर ...!
आदरणीय अब्राहम लिंकन यांस सप्रेम नमस्कार ,
आपलं पत्र वाचलं । खरच खुप गोड छोकरा आहे हो तुमचा ...! तुम्ही त्याच्यासाठी जेव्हडंही मागितला न तेव्हडंही कमीच आहे ! अर्थात जमेल तेव्हढं देइलच मि त्याला ... पण तुम्ही संगता शिकवायच की , जगात प्रत्येक बदमाशागानिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही अन इथे तर हजारो बदमाशागानिक असतो एखादाच साधुचरित पुरुषोत्तम ... तो ही हतबल ... मुक्य बहिरया सारखा ! आपला अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते आहेत इथे , पण कश्यासाठी? तर अवाघ्यांची अवघी आयुषे उध्वस्त करण्यासाठी ...!
वैरी तर असतातच टपुन अधाशा सारखे पण मित्र ही टपुन असतात वैर्या सारखे .... तेव्हा कसा शिकवू त्याला की जपणारे मित्रही असतात म्हणुन ! हो मला माहित आहे की सगळ्या गोष्टी नाही शिकवता म्हणुन पण इथे धीर आहेच कुणाला ? सर्वाना हवं आहे सगळं काही झटपट ! ! त्यासाठी असतात बरेचसे 'शोर्टकट' ! काही न करताच खुप काही मिळवता येतं इथे आणि मीरवता ही येतं राजरोसपणे ! तेव्हा कसा सांगू की घामाचा एकाच छदाम मौल्यवान असतो म्हणुन !
जरुर शिकविन मि त्याला हर कशी स्वीकारावी अन विजय कसा साजरा करावा ते ... पण जेव्ह त्याला हे कळेल की ' जिन्कायचं कुणी आणि हरायचं कुणी याचा फैसला अगोदरच मैदानाबाहेर होत असतो' तेव्हा त्याला माझी शिकवण हास्यास्पद वाटणार नाही का?
तुम्ही म्हणता की गुंडाना न भीत जन्याचं शिकवा त्याला... अहो पण गुंडाना न भिउन तो जेल कुठे ? पोलिसांकडे ??? पोलिसच गुंडाच्या गळ्यात गळे घालताहेत ...! हे पाहून तो जाइल कुठे? नेत्याकडे ??? नेतेच गुडाचे सखे सोबती आहेत....! हे ही पाहून तो जाइल कुठे? जनतेकडे ??? जनता तर घरात आतून कुलुप लॉन चिडीचुप बसलेली ...! मग कुठे जाइल तो? मृत्युकडे ??? छ्छे !!! असं मी होऊ देणार नाही!!! प्रानात प्राण असे पर्यन्त मी त्याला सांगेन ' बाबारे गुंडाना भीत जा ... जगायाचे असेल तर ...!'
गाड़ी , बंगला , उंची पोशाख , हायफाय सोसाइटी ही इथल्या वैभावाची संज्ञा ! त्यात ग्रंथ असतील तर शोकेसची शोभा वाढविन्यापुरतेच! मग कश्याला दाखवू मी त्याला ग्रंथ ( अद्भुत ) वैभव...! टी व्ही चनेल्स , डिस्को-पब च्या जमान्यात कसा मिलावुन देऊ मी त्याच्या मनाला निवान्तपना....!
परसेंटेज च्या रेसमध्ये झापड़बंद घोड्यासारखा धवनारा तो... कशी दाखवू मी त्याला पक्ष्याची आसमानभरारी! तुमच्या अफाट अपेक्षांचे ओझे घेउन चलानारं पोर ते ... कसा दाखवू मी त्याला सोनेरी उन्हात भिरभिर्नारे भ्रमर ...? सीमेंट कांक्रेट च्या जंगलात गड़प झालेला निसर्ग ... अन कुठून दाखवू त्याला हिरवेगार डोंगरउतार अन डॉलनारी फुले...! शाळेत दिल मी त्याला धडा की , फसवून मीळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर असतं म्हणुन ...! पण इथे तर फसवा फसवी केल्याशिवाय यशच मिळत नाही , हे जेव्हा तो अनुभवातून शिकेल तेव्हा तो मला मुर्खात काढनार नाही का?
ठीक आहे , सांगेन मी त्याला की भल्याशी भल्यानं वागावं म्हणुन ... पण ठग्याना अद्दल घडविन्यास कसं सांगू? कारण इकडे तिकडे ठग्यांची चलती अन भल्यांची गलेचेपी ....! पटवून देईल मी त्याला - जिकडे सरशी तिकडे धावनार्या भावु गर्दित सामिल न होन्याचं... पण जेव्हा त्याची एकट्याची दमछाक होत जाईल भ्रमनिरास अन पादरी येइल त्याचा अपमान आणि उपहास...! तेव्हा तो माज्या नावानं बोटं मोडणार नाही का ?
सांगेन मी त्याला जे घ्यावं ते सत्याच्या गाळणीतुन गाळूण घ्यावं पण उद्या जर त्यानं विचारलं की सत्य आहे कुठे ...? तेव्हा काय सांगू मी त्याला ...! जिथे कचर्यचिही जाहिरात केली की , सोन्याचा भाव येतो ... तिथे कशी सांगू मी त्याला निखळ सत्याची महती ?
खोट्या दुखाच खोट्या आसवाची दुकान थाटनार्याचा हा जमाना अन कसं सांगू मी त्याला उरतलं दुख दाबुन हसत रहायचं ...! वाटेल ते विकून वाटेल तेवड़ी कमाई करण्याचे हे दिवस ... अन कसं बिम्बवु मी त्याच्या मनावर कमाल कमाई करण्याचं ! कवडीचीही लायकी नसतांना त्यांनी पटकावलेल्या महत्व्याच्या जागा... त्यांच्या पुढे शेपटी हलवल्याशिवय काही मिळन्याची सुतराम ही शक्यता नाही , अन कसं सांगू मी त्याला चाटूगिरी पासून सावध राहायला ॥?
इथे प्रत्येकाला कुठे ना कुठे , कधी ना कधी , कुणापुढेतरी झुकावं लागतं ... परिस्तिती नेईल तिकडे जावं लागतं.. मग त्यानं आगीत तावुन सलाखुन पोलाद व्हायचं कश्यसाठी? मी तर त्याला सांगेन - ' बाबारे आपला स्वाभिमान, भावना, संवेदना यांना बोथट करून अगदी गोल गोट्यासारखा हो ... गुळगुळीत! वेळ आली की कुठे ही कलांडता आलं पाहिजे ना!
इथे पाया खालच्या मातीचा भरवसा राहिलेला नाही तीथं कसं बसवू मी त्याच्या मनावर सत्य आणि न्यायासाठी पाय रोवून उभं रहन्याचं ...! आपल्या स्वार्थाला थोडाही धक्का लागला तर एकमेकंच्या जीवावर उठतात माणसे इथे ! अन मी कसा सांगू त्याला माणवजातीवर उदात्त श्रधा ठेवायला ...!
माफ करा लिंकनसाहेब मी फार बोलतो आहे ! म्हणाल तर निराश्यावादी माणुस! पण मी निराश नाही ॥ वस्तुस्थिति तशी आहे, त्याला मी तरी काय करणार???
उद्याच्या भयावह भविष्याची मला जेव्हा जाणीव होते , तेव्हा मला तुमच्या निरागस, निष्पाप मुलाचा चेहरा डोळ्यापुढे तरळायला लागतो ... काळजात खोल खोल गड्डा पडतो . काय होइल त्याचं? .... भलताच गोड छोकरा आहे तो ....!!!
संदीप वाकोडे
मुर्तिजापुर जि। अकोला
मुर्तिजापुर जि। अकोला
No comments:
Post a Comment